मिसेस युनिव्हर्स फायनलिस्ट झोया शेख घेऊन आल्या आहेत “कारा मिस अँड मिसेस महाराष्ट्र २०२५, मिसेस इंडिया सुप्रानॅशनल आणि मिसेस सुप्रानॅशनल, ज्यांच्या माध्यमातून महिलांना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आणि आत्मविश्वासाचा सुवर्ण मंच कारा झोया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालिका मिसेस झोया सिराज शेख, ज्यांनी मिसेस महाराष्ट्र २०२२ चा मुकुट जिंकला आणि नंतर मिसेस युनिव्हर्स २०२२-२३ मध्ये तिसऱ्या क्रमांकाची उपविजेती म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले, आता महिलांसाठी घेऊन आल्या आहेत असे तीन भव्य स्पर्धा मंच जे सौंदर्य, व्यक्तिमत्त्व आणि उद्दिष्ट यांचा उत्सव साजरा करतात.
या स्पर्धा मिसेस सुप्रानॅशनल (आंतरराष्ट्रीय स्तर), मिसेस इंडिया सुप्रानॅशनल (राष्ट्रीय स्तर) आणि मिस अँड मिसेस महाराष्ट्र २०२५ (राज्य स्तर) महिलांच्या प्रतिभा, संवादकौशल्य आणि सामाजिक जबाबदारीवर प्रकाश टाकणार आहेत. यामध्ये विशेष “आय अॅम इनफ” या उपक्रमाद्वारे विधवांच्या सक्षमीकरणावर भर दिला जाणार आहे.
या सिझनचा भव्य अंतिम सोहळा गोव्याच्या आलिशान क्रूझवर होणार असून, स्पर्धकांना मिळणार आहे ग्लॅमर, आत्मविकास आणि आत्मविश्वासाचा एक अविस्मरणीय अनुभव. या सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत बॉलिवूड अभिनेत्री हिना खान, तर मागील सिझनमध्ये टेरेन्स लुईस आणि नेहा धूपिया यांसारख्या नामांकित व्यक्तींनी या मंचाला चारचाँद लावले होते.
या उपक्रमाबद्दल मिसेस झोया सिराज शेख यांनी सांगितले “प्रत्येक स्त्रीकडे स्वतःची एक कहाणी, एक ताकद आणि एक तेज असते, ज्याला जगासमोर येण्याचा हक्क आहे. कारा या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही केवळ सौंदर्य साजरे करत नाही, तर आत्मविश्वास, धैर्य आणि व्यक्तिमत्त्व यांचा गौरव करत आहोत. माझे स्वप्न आहे की प्रत्येक स्त्रीला असा मंच मिळावा, जिथे ती स्वतःवर विश्वास ठेवून जगाला प्रेरणा देऊ शकेल.”
https://www.youtube.com/shorts/FD-kP9niyIE
नोंदणी व संपर्क तपशील:
नोंदणीची शेवटची तारीख: २० नोव्हेंबर २०२५
📞 संपर्क: +९१ ९३२२७ १०१९२ / +९१ ७५०६३ १२२०१
🌐 संकेतस्थळ: www.mrsindiasupranational.com
📸 इंस्टाग्राम: @mrsindiasupranationalofficial
मिसेस युनिव्हर्सपासून मार्गदर्शकापर्यंत झोया शेख देत आहेत महिलांना चमकण्यासाठी जागतिक मंच

